Thursday, August 31, 2023

वय

मला  समजलेल मानसशास्त्र 411                

....वय....

                                  खरंच वयाच्या काही व्याख्या तयार करून आपण मनाच्या शब्दकोशात ..कायम स्वरुपी साचवल्या आहेत.बालपण ..तारुण्य.. वृद्धावस्था याप्रमाणे प्रत्येक अवस्थेत ..शरीरातील बदल आपण पहातो..

            त्यातील बालपण व तारुण्य हे आपण उर्जा पूर्ण मानतो..तर वृद्धत्व हे आजाराचे माहेरघर व मृत्युकडेनेणारी अवस्था आपण मानतो.पण ते खरं आहे का?

              माझ्या मते अजिबात नाही.. आपल्या मनात वर्षोनुवर्षे वृद्धत्वाची जी पार्श्वभूमी आपण तयार केली आहे..ती याला कारणीभूत आहे...वृद्धत्व देखील उर्जा पूर्णच असतं . पण  त्याबाबतीत तयार झालेली नकारात्मक मानसिकते..
मुळे तसं घडत.जर तुम्ही वृद्धत्वाकडेही... सकारात्मक मानसिकतेतून पाहिल तर ...ते  देखील उर्जेने व चैतन्याने परिपूर्ण असतं.

आता माझं वय झालं..आता काय संपलं ..किती दिवस राहीले .. आता मला पहिल्यासारख वाटतं नाही.. अश्या नकारात्मक मानसिकतेमुळे शरीर साथ देत नाही..हीच मानसिकता जर तारुण्यातही मनात आली.. तरी उर्जा व चैतन्य संपत ..मग राहते फक्त दुर्बलता..

                          काय कारण आहे काहीजन.. वाढत्या वयातही  उर्जापूर्ण असतात.. तर काही अंथरुणाला खिळतात..त्याच कारणं म्हणजे मनाची दुर्बलता किंवा सबलता.
                       
म्हणून वयाच्या कुठल्याही अवस्थेत असा.. तुमच्या मनाच्या मानसिकतेवर सर्व काही अवलंबून असते..मग दुर्बल व्हायचं का सबल तुमचे तुम्ही ठरवा.

नेहमी प्रमाणे स्वस्थ राहा आणि मस्त राहा 😋

                                        ......गोपालदास पाटील.....

Wednesday, August 2, 2023

अनावश्यक ताणतणाव..

खरंच रोजच्या बातम्या मधुन मानसिक तणावातून घडलेल्या घटनांमधून कळतं की किती मानसिक तणाव किंवा डिप्रेशन मधून अश्या घटना घडत आहेत..ज्यात इतरांचा जीव घेत..स्वताही संपत आहेत.. 

कारणं भलेच काहीही असतील..पण शेवटी मानसिक तणावातूनच ह्या घटना घडत आहेत..मग ते पुणे येथील पोलीस अधिकार्‍याने केलेलं प्रकरणं किंवा नुकतंच आरपीएफ जवाना कडून झालेलं रेल्वेतील हत्याकांड..हे सर्व का घडलं.. कसं घडलं याचा तपास पोलीस करतीलच..

पण हे का घडतं..कश्यामुळे घडतं याची कारणं कळली पाहिजेत.. भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.. त्यातील सर्वात प्रमुख भाग अभ्यासला गेला पाहिजे..ते म्हणजे .. नैराश्य आणि मानसिक ताणतणाव.. 

मला वाटतं यांवर सर्वात चांगला उपाय म्हणजे.. मेडीटेशन.. ध्यानधारणा.. थोडक्यात जर एक दहा मिनिटे डोळे मिटून अंतर्मनात डोकावून पहायला शिकलं तर वर नमूद समस्यांच निराकरण होवू शकत.आणि ती आज काळाची गरज आहे.. कारणं असं म्हणतात मन चंगा तर कटोरी में गंगा.म्हणून मन सुदृढ असायला हवं.