Monday, November 5, 2018

मला समजलेले मानसशास्त्र 4

     

समाधान


    मन चंगा तो कटोरीमें गंगा.खरच ही अगदी सार्थ म्हण आहे.मन समाधानी नसेल तर ऐश्र्वर्यही प्रभावहीन होते.म्हणून आपल्या आयुष्यात आनंद आणि समाधानाला प्रथम स्थान द्द्या.

    पण ते समाधान चांगल्या सवयी व कामातून मिळाले पाहिजे.चंचल मनाला योग्य दिशेला वळवून राग ,लोभ आणि अहंकार विरहीत व चार लोकांना , आपल्याला त्यातुन आनंद व समाधान मिळेल ,ते खरे समाधान .

    असे समाधान ज्याला मिळवता येत , तो खरा मनोशिल्पकार.कारण स्वताच्या व इतरांच्या भावनां जपणे ज्याला जमते,तो समाजात मनस्वास्थ निर्माण करण्याचं काम करतो.सुदृढ मानसिकतेचे धडे गिरवणारा देखील मानसशास्त्रातील एक स्तंभ म्हणायला हरकत नसावी.

गोपालदास पाटील

Saturday, November 3, 2018

मला समजलेले मानसशास्त्र 3

 संघर्ष

 
मला वाटतं दोन पिढ्या तील संघर्षाला सुरुवात होते ती अधिकारावरुन.जुनी पीढी सहजी आपले अधिकार सोडायला तयार नसते.कारण ती त्या पिढीतून आलेली असतें ज्यात ते अधिकार मिळवण्यापूर्वी वयाची 40शी ओलांडलेली असते.पण नवीन पिढीला मात्र ते लगेच हवे असतात.
 
        खरं तर पूर्वी एक कुटुंब प्रमुख 50 ते 100 लोकांचे कुटुंब हाताळायचा.संबधही आलोखी आणि जिव्हाळ्याचे असायचं. मग आता काय झालं. आता सर्व उच्चशिक्षित झाले पण. संस्कारांचाा अभाव म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांवर आलोखी, प्रेम , जिव्हाळ्याचे संस्कार घडायचे.वडीलधार्यांचा आदर केला जायचा.पण आज ती परिस्थीती बदलली.

       विभक्त कुटुंब पद्धती मुळे मुलांना फक्त आईवडीलांचे नाते माहित असते.इतर नात्यांच्या बाबतीत जिव्हाळा उत्पन्न होत नाही.एकटे राहण्याची सवय व स्वतापुरत पहाण्याची सवय लागते.त्यातूनच मानसिकताही बदलते.पुर्वी स्थळ पहाताना मुलीं साठी मोठं घर म्हणजे जास्त सदस्यअसलेल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं जायचं.पण आता मात्र मुलगा एकटाच आहे ना ?,त्यांच्यावर इतर जबाबदारी नाही ना? अश्या संकुचितमानसिकतेचे दर्शन घडते.

        पूर्वी घटस्फोटाचे प्रकार फार कमी होते पण आता त्यातही वाढ झालेली दिसून येते.हे सर्व दोष विभक्त कुटुंब पद्धतीचे आहेत.कारण संस्कार घडत नाही ,आलोखी निर्माण होत नाही.
 
        ठीक आहे , आजची जीवनशैली बदलली आहे.कामानिमित्त सर्वांना एकत्रित राहाने शक्य नाही.पण जिव्हाळा कायम राहाण्यासाठी आपण वर्षातून दोनदा मुलांना सुट्या असताना एकत्र येऊन आपल्या हरवलेल्या गोष्टी मिळवू शकता, त्या गोष्टी म्हणजे आपसातील प्रेम आणि जिव्हाळा.शेवटी एव्हढच म्हणेल.......
 
वाढवा प्रेम जिव्हाळा..
आपसातील संघर्ष टाळा

गोपालदास पाटील


Friday, November 2, 2018

मला समजलेले मानसशास्त्र २

दिल्ली मुंबई रेल्वे प्रवासातील ही घटना.


    वरवर पाहिलं तर रोजच्या प्रवासात अनेकजण भेटताता पण त्यातील काही ठराविक लक्षात राहतात. मधे एका स्टेशनवर गाडी थांबली असता एक साधु , पांढरी वस्त्रे परिधान केलेला व एक विदेशी महिला डब्यात प्रवेश करतात. तो साधु साधारण वय असेल 24,25 वर्षं.नंतर ती लेडी व त्याच्यात इंग्रजीत संभाषण सुरू झाल.अस्खलीत इंग्रजीत बोलत होता.जिज्ञाशेने मी विचारलं की साधु असूनही इतकं चांगलं इंग्रजी कसे बोलता. उत्तर होते मी 8 वर्ष U S ला होतो व ही एक संगीत टीचर आहे ही मला तेथेच भेटली. थोडयाच वेळात चेकर आला.दोघानी आपापले पासपोर्ट दाखविले.

 मग झाली संभाषणाला सुरवात. त्याने सांगितले तो नेपाळचा आहे . त्यांच्या गुरुने स्वताचा मार्ग स्वता शोधायला सांगितला.त्यासाठी तो हिमालय ,मथुरा नासिक परिसर अश्या अनेक ठिकाणी जाऊन आला.इतका शिकलेला व US सारख्या चांगल्या ठिकाणी चांगली नोकरी सोडून या तरुण वयात हा रानोमाळ का फिरत आहे हे एक कोडेच आहे.

मेडीटेशन ,अघोरी साधना, यावर तो बरेच काही समर्पक बोलला.त्याला मी एक प्रश्न असा केला की, गेले काही वर्षांत अस्या बर्याच घटना घडल्या ज्यात दर्शनासाठी गेलेली बरीच लोक मृत्युमुखी पडले, मग ती मागे छत्तीसगड केदारनाथ येथील प्रलय असो किंवा
भाविकांच्या गाड्यांना झालेले अपघात ,असं का होत ,खरं देवाने या त्यांच्या भाविकांना वाचवायला हवं होत.

यावर त्याने दिलेले उत्तर फार समुचित होत.तो म्हणाला संसारी व्यक्तीकी सोच अलग होती है.हम साधु इसे मुक्ती के नजरिये से देखते है. मुक्ती पाने के लिये सहस्त्र योनीयो हे गुजरना पडता है.मनुष्य योनी से वो समयसे पहले मुक्ती पा गये ,ये तो उनके लिये भगवानका वरदान है.मी निरुत्तर झालो.खरच पहाण्याच्या दृष्टीकोनातून मानसशास्त्र बदलते.

मी मृत्युला शोकांतिकेच्या दृष्टीने पाहुन प्रश्नचिन्ह उभे केले पण त्याने मात्र मृत्यूला मुक्ती संबोधून सकारात्मकतेचा परिचय दिला व सर्व गोष्टी निरपेक्षपणे कश्या पहाव्यात हे सांगितले.

.............. जी. एम्. पाटील...........

Thursday, October 25, 2018

मला समजलेले मानसशास्र 1

 

 ..जीवन आनंद..

जीवनात सर्वच वाईट असतं असं काही नाही. 

दुःखाच्या क्षणी चांगले क्षण आपण आठवत नाही.

चांगल्या क्षणांचा हा सुगंध असा उधळत जावा.

पाहुनी सुगंधी फुलांनाही वाटला पाहिजे हेवा.

रडगाने गाण्यासाठी मित्रांनो हे आयुष्य नसते.

शोधले तर सापडतात अनेक आनंददायी रस्ते.

......... गोपालदास पाटील............




Monday, November 3, 2014

माझी नात


         माझी नात










माझ्या घरी नात म्हणून आली छोटी परी 
आतापासूनच ती सर्वांची काळजी करी 

कोण आल कोण गेल असत नेहमी लक्ष 
घरातील सर्वासाठी असते नेहमी दक्ष 

सांगण्यासारखं अजून बरच आहे काही
खर सांगतो मुलीसारख प्रेम कोणाच नाही

सर्वासाठी त्याग करण्यात ती असते पुढे
आईवडिलांचा जल्म सार्थक होतो फक्त मुलीमुळे

वंशाचा दिवा वगेरे अस नसत काही
मुलीच असतात खर्‍या प्रेमाची ग्वाही.

मुल आणि मुली यात करू नका भेद
स्त्री भ्रूणहत्येला द्या तुम्ही छेद.
   
   
                            
                                 ~जी. एम. पाटील