Friday, November 2, 2018

मला समजलेले मानसशास्त्र २

दिल्ली मुंबई रेल्वे प्रवासातील ही घटना.


    वरवर पाहिलं तर रोजच्या प्रवासात अनेकजण भेटताता पण त्यातील काही ठराविक लक्षात राहतात. मधे एका स्टेशनवर गाडी थांबली असता एक साधु , पांढरी वस्त्रे परिधान केलेला व एक विदेशी महिला डब्यात प्रवेश करतात. तो साधु साधारण वय असेल 24,25 वर्षं.नंतर ती लेडी व त्याच्यात इंग्रजीत संभाषण सुरू झाल.अस्खलीत इंग्रजीत बोलत होता.जिज्ञाशेने मी विचारलं की साधु असूनही इतकं चांगलं इंग्रजी कसे बोलता. उत्तर होते मी 8 वर्ष U S ला होतो व ही एक संगीत टीचर आहे ही मला तेथेच भेटली. थोडयाच वेळात चेकर आला.दोघानी आपापले पासपोर्ट दाखविले.

 मग झाली संभाषणाला सुरवात. त्याने सांगितले तो नेपाळचा आहे . त्यांच्या गुरुने स्वताचा मार्ग स्वता शोधायला सांगितला.त्यासाठी तो हिमालय ,मथुरा नासिक परिसर अश्या अनेक ठिकाणी जाऊन आला.इतका शिकलेला व US सारख्या चांगल्या ठिकाणी चांगली नोकरी सोडून या तरुण वयात हा रानोमाळ का फिरत आहे हे एक कोडेच आहे.

मेडीटेशन ,अघोरी साधना, यावर तो बरेच काही समर्पक बोलला.त्याला मी एक प्रश्न असा केला की, गेले काही वर्षांत अस्या बर्याच घटना घडल्या ज्यात दर्शनासाठी गेलेली बरीच लोक मृत्युमुखी पडले, मग ती मागे छत्तीसगड केदारनाथ येथील प्रलय असो किंवा
भाविकांच्या गाड्यांना झालेले अपघात ,असं का होत ,खरं देवाने या त्यांच्या भाविकांना वाचवायला हवं होत.

यावर त्याने दिलेले उत्तर फार समुचित होत.तो म्हणाला संसारी व्यक्तीकी सोच अलग होती है.हम साधु इसे मुक्ती के नजरिये से देखते है. मुक्ती पाने के लिये सहस्त्र योनीयो हे गुजरना पडता है.मनुष्य योनी से वो समयसे पहले मुक्ती पा गये ,ये तो उनके लिये भगवानका वरदान है.मी निरुत्तर झालो.खरच पहाण्याच्या दृष्टीकोनातून मानसशास्त्र बदलते.

मी मृत्युला शोकांतिकेच्या दृष्टीने पाहुन प्रश्नचिन्ह उभे केले पण त्याने मात्र मृत्यूला मुक्ती संबोधून सकारात्मकतेचा परिचय दिला व सर्व गोष्टी निरपेक्षपणे कश्या पहाव्यात हे सांगितले.

.............. जी. एम्. पाटील...........

No comments:

Post a Comment