Friday, November 3, 2023

आत्मपरीक्षण

                              इतरांना नांवे ठेवून टीकाटिप्पणी करत बसण्यापेक्षा स्वतातील कमतरता व दोषांच आधी अध्ययन केले पाहिजे.निंदकाचे घर असावे शेजारी ह्या म्हणीनुसार त्यातील चांगले ते घ्यावे..याचाच अर्थ निंदक आपल्यातील कमतरता किंवा दुर्गुण दाखवण्याचा प्रयत्न करतात.. त्यातुन आपल्यात काय बदल करावा ते कळते
.. थोडक्यात आत्मपरीक्षणांने .‌‌..आपण परिपूर्णतेकडे
वाटचाल करतो...

Thursday, October 19, 2023

नाती..

..मला समजलेल मानसशास्त्र..426

             नाती अनेक आहेत.आईवडील..भाऊबहिण
..सासूसूना..यासारखी अनेक नाती आहेत..पण नात्या..
नात्यात देखील उजवडाव केलं जातं.

           सासू..सून..आणि मुलगी .. तिन्ही स्रियाच..पण वागण्यात पक्षपातीपणाच का असतो.... हा मोठा प्रश्न आहे.. अर्थात सर्वच ठिकाणी मी म्हणतो तसंच आहे
....असही नाही.. अर्थात अपवाद असू शकतात.

                      एक व्यसनी मुलगा.. संपूर्ण कुटुंब वेठीस धरतो..जगन नकोसं करतो..पण तरी देखील आई...‌ मुलालाच गोंजारते.. 

                                जेंव्हा की त्याच्या व्यसनामुळे व उद्दाम वागण्यामुळे सूनेची अवस्था बिकट असते.. तिच्या वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसतात..येथे मात्र सासूच
मातृत्व जाग होत नाही.. खरंतर सूनेच्या डोक्यावर ममतेच छत्र धरणं..सासूच कर्तव्य असायला हवं..येथे मात्र उलटं अनुभव .. सारखं सारखं माहेरी का फोन करते असं सुनावलं जात.

                            पण हेच जर स्वताच्या मुलीच्या बाबतीत असलं.. तर मात्र जावायाला धारेवर धरलं जात..मग स्वताचा मुलगा चुकीच वागत असेल तरीही त्याला का गोजांरल जात. का सूनेची बाजू घेतली जात नाही..

                             सांगायचं तात्पर्य योग्य बाजू घेवून सपोर्ट करावा..नाहीतर आंधळ्या प्रेमापोटी चुकीची बाजू घेवून समर्थन केल्यास.. कलह टोकाला जावून..नको ते घडू शकते ..ह्याच भान राखलं पाहिजे.

        अर्थात काही ठिकाणी सूनांच्या त्रासामुळे कुटुंब विस्कळीत झाल्याचीही उदाहरणं आहेत..

  खरंतर अश्या घटना घडू नयेत म्हणून कुटुंबातील सर्वच सदस्यांनी काळजी घेतली पाहिजे.

             ....... गोपालदास पाटील.......

Thursday, August 31, 2023

वय

मला  समजलेल मानसशास्त्र 411                

....वय....

                                  खरंच वयाच्या काही व्याख्या तयार करून आपण मनाच्या शब्दकोशात ..कायम स्वरुपी साचवल्या आहेत.बालपण ..तारुण्य.. वृद्धावस्था याप्रमाणे प्रत्येक अवस्थेत ..शरीरातील बदल आपण पहातो..

            त्यातील बालपण व तारुण्य हे आपण उर्जा पूर्ण मानतो..तर वृद्धत्व हे आजाराचे माहेरघर व मृत्युकडेनेणारी अवस्था आपण मानतो.पण ते खरं आहे का?

              माझ्या मते अजिबात नाही.. आपल्या मनात वर्षोनुवर्षे वृद्धत्वाची जी पार्श्वभूमी आपण तयार केली आहे..ती याला कारणीभूत आहे...वृद्धत्व देखील उर्जा पूर्णच असतं . पण  त्याबाबतीत तयार झालेली नकारात्मक मानसिकते..
मुळे तसं घडत.जर तुम्ही वृद्धत्वाकडेही... सकारात्मक मानसिकतेतून पाहिल तर ...ते  देखील उर्जेने व चैतन्याने परिपूर्ण असतं.

आता माझं वय झालं..आता काय संपलं ..किती दिवस राहीले .. आता मला पहिल्यासारख वाटतं नाही.. अश्या नकारात्मक मानसिकतेमुळे शरीर साथ देत नाही..हीच मानसिकता जर तारुण्यातही मनात आली.. तरी उर्जा व चैतन्य संपत ..मग राहते फक्त दुर्बलता..

                          काय कारण आहे काहीजन.. वाढत्या वयातही  उर्जापूर्ण असतात.. तर काही अंथरुणाला खिळतात..त्याच कारणं म्हणजे मनाची दुर्बलता किंवा सबलता.
                       
म्हणून वयाच्या कुठल्याही अवस्थेत असा.. तुमच्या मनाच्या मानसिकतेवर सर्व काही अवलंबून असते..मग दुर्बल व्हायचं का सबल तुमचे तुम्ही ठरवा.

नेहमी प्रमाणे स्वस्थ राहा आणि मस्त राहा 😋

                                        ......गोपालदास पाटील.....

Wednesday, August 2, 2023

अनावश्यक ताणतणाव..

खरंच रोजच्या बातम्या मधुन मानसिक तणावातून घडलेल्या घटनांमधून कळतं की किती मानसिक तणाव किंवा डिप्रेशन मधून अश्या घटना घडत आहेत..ज्यात इतरांचा जीव घेत..स्वताही संपत आहेत.. 

कारणं भलेच काहीही असतील..पण शेवटी मानसिक तणावातूनच ह्या घटना घडत आहेत..मग ते पुणे येथील पोलीस अधिकार्‍याने केलेलं प्रकरणं किंवा नुकतंच आरपीएफ जवाना कडून झालेलं रेल्वेतील हत्याकांड..हे सर्व का घडलं.. कसं घडलं याचा तपास पोलीस करतीलच..

पण हे का घडतं..कश्यामुळे घडतं याची कारणं कळली पाहिजेत.. भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.. त्यातील सर्वात प्रमुख भाग अभ्यासला गेला पाहिजे..ते म्हणजे .. नैराश्य आणि मानसिक ताणतणाव.. 

मला वाटतं यांवर सर्वात चांगला उपाय म्हणजे.. मेडीटेशन.. ध्यानधारणा.. थोडक्यात जर एक दहा मिनिटे डोळे मिटून अंतर्मनात डोकावून पहायला शिकलं तर वर नमूद समस्यांच निराकरण होवू शकत.आणि ती आज काळाची गरज आहे.. कारणं असं म्हणतात मन चंगा तर कटोरी में गंगा.म्हणून मन सुदृढ असायला हवं.

Friday, July 28, 2023

खरं प्रेम..

                  ..छायाचित्रातील विडीओचे शब्दांकन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.कारण सर्वच .. शब्दांपलीकडे आहे .

   माझ्या कडील गायीच.. हे प्रेमळ वासरु.. किती निरागस प्रेमाने .आपल्या 
भावना व्यक्त करत आहे...सकाळ सायंकाळ ..चारापाणी.. साफसफाई..
त्यांच्या अंगावरुन प्रेमाणे हात फिरवणे..इतकच असतं......पण त्याची परतफेड ते किती दामदुप्पटीने करतात..हे दिसून येत.

यातून एक सिद्ध होत.. प्रेम आणि जिव्हाळ्यात खूप ताकद आहे.कळत नकळत हे धागे इतके घट्ट होतात की मुके प्राणीही आपल्या कृतीतून बोलायला लागतात.. ह्या विडीओत हे वासरु...कृतीतून प्रेमाचा वर्षाव करत आपल्या भावना .. ज्या पद्धतीने व्यक्त करत आहे..ते पाहून पटतं की.. संवेदना व्यक्त करण्यासाठी भाषेची किंवा बोलायची गरज नाही.. फक्त स्पर्श पुरेसा आहे निख्खळ प्रेम व्यक्त करण्यासाठी.

थोडक्यात प्रेमात आहे इतकी शक्ती की जग जोडले जाते.
याची प्रचिती सर्व मानव..पशु ..पक्षी ..जलाचरात येते...
म्हणून प्रेमाणे जग जोडा..पण त्यासाठी अहंकार सोडा.

       ...... गोपालदास पाटील........


मृगजळ

              समाधान आणि आनंद शोधण्यासाठी आपण धावत आहोत मृगजळामागे..शेवटी आपली अवस्था तीच होते ..जी त्या हरणाची..जे आयुष्यभर त्यासाठी धावंत पण मिळतं काय ? फक्त दमछाक.

जगायला लागत काय..रोटी कपडा और मकान..पण आपण तेव्हढ्यावर थांबतो का? अजिबात नाही..खोटी प्रतिष्ठा.. अनावश्यक चमकधमक साठी आपण संपूर्ण जीवन पणाला लावतो..शंभर वर्षे जगणारा माणूस आज 60 वर येवून ठेपला आहे. पूर्वीची आणि आताची जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे.शारीरीक श्रमाने शरीर धडधाकट राहायचा.. त्यामुळे शरीर व मना स्वस्थ राहायचं.. स्वस्थ छान झोपेच वरदान होत..पण आता फक्त आहे धावपळ आणि ताणतणाव..अगदी मृगजळामागे आभासी गोष्टीसाठी धावणार्‍या हरणासारख. 

म्हणून खरं जीवन जगायला शिका.. अनावश्यक दमछाक टाळा..आभासी जगामागे धावू नका.. नैसर्गिक गरजा थोड्या आहेत.. निसर्गाशी प्रमाणिक राहा.. मानवी शरीर आणि यंत्र यातील फरक ओळखा.. यंत्र बनू नका..

Tuesday, July 25, 2023

व्यसन..

                           ...व्यसनं हे , आकाशात दाटलेल्या ढगांसारख असतं ..जे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकतं..उन्नतीचा सुर्य झाकोळून टाकतो..आशेची किरणं दिसेनासी होतात..समोर असतो..काळाकुट्ट अंधार..

सुरवातीला मजेखातर किंवा पराजित मानसिकतेतून व्यसनाधीन झालेल्यांची ..नंतर मात्र... व्यसन एक शारीरिक आणि मानसिक गरज बनते..कारण त्याशिवाय ते बेचैन होतात..

                           त्यांनाही सर्व कळतं ..पण ते सवयीचे गुलाम बनतात..त्यातुन तोच बाहेर पडतो .. जो अपराजित मानसिकतेला पराभूत करून..स्वताच्या ईच्छा शक्तीच्या जोरावर बाहेर पडतो..

                                     पण यातून बाहेर पडणारे फार कमी असतात..कारण परिस्थिती समोर हार मानणारे ..कधी जेते होत नाही..
   
               शेवटी जेते होण.. हे..असिम ईच्छाशक्ती..आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम व त्यातील सातत्यावर अवलंबून असते..मग जिंकायच ना..मग करा सुरवात.

स्वस्थ राहा ❤️... मस्त राहा ❤️

Sunday, July 23, 2023

अतिरेक

                                   अतिरेक कोणत्याही गोष्टीचा असो परिणाम.  वाईटच.अतिश्रम..अतिआराम..अति धावपळ..अति ताणतणाव.. थोडक्यात अति तेथे माती ही म्हण सार्थ आहे .म्हणून जीवन संतुलीत हवे..

         शारीरीक आणि मानसिक आराम फारच गरजेचा आहे..तरच तुम्ही स्वस्थ आणि आनंदी जीवन जगू शकता जगातील बहुतेक समस्यांच मूळ अतिरेक.... त्यातुनच निर्माण होतेयुद्धजन्य परिस्थिती.. नैसर्गिक आपत्ती
.. धार्मिक जातीय ताणतणाव..दंगली..अहंकार..क्रोध.. ह्या सर्वांच मूळ आहे अतिरेक.. म्हणूनच रबर तुटेपर्यंत ताणू नका.. अतिरेकातून सर्वनाश आहे..

                                   म्हणूनच सुदृढ मानसिकतेसाठी ध्यानधारणा व शारीरिक स्वास्थ्यासाठी शारीरिक व्यायाम काळाची गरज आहे..कारण मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ..आणि ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या स्वस्थ असतील
..तर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्वस्थ समाज जन्माला येईल..ज्यात कुठेही ताणतणाव नसेल आणि खर्‍या अर्थाने मानवी जीवन सुजलाम सुफलाम होईल.

मग करुया प्रयत्न स्वस्थ आणि मस्त जीवन जगण्याचा.. स्वस्थ राहा ❤️ मस्त राहा ❤️

Friday, July 21, 2023

... मानसिकता...

आपल्या देहबोलीतून कळते आपली मानसिकता.  चेहरा..डोळे .. शारीरीक हालचालीतून कळतो..आपला आत्मविश्वास.

 आत्मविश्वास आपल्या ..मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर अवलंबुन असतो.म्हणून काळजी सोडा..आनंदी राहायला शिका..आहे ते स्वीकारायला शिका.. दृष्टी बदला... सृष्टी बदलेल..एक सुंदर सहज आणि आनंदी जीवनासाठी ..ते फार गरजेचे आहे.

                 ...... गोपालदास पाटील.....

पूर्व मानसिकता

मनाने काही गोष्टी आधीच संचयीत केलेल्या असतात.. स्मशान..एक भयानक जागा..शोक आणि दुःख असलेली जागा. मंदिर म्हणजे निरव शांतता.. प्रसन्नता आणि आनंद समाधान देणारी जागा.आणि यासारख दैनंदिन अनुभवातून..बरंच काही .. मन आधीच साचवत असतं. 

नंतर  म्हणून मंदिरात जायचं म्हटलं म्हणजे अंतर्मनाचा लगेच प्रसन्नता जाहीर करत..त्याचे प्रतिसाद बाह्य मनाव्दारे स्विकारले जातात..आणि..त्यावरच त्या वेळी त्या व्यक्तीचा मुड अवलंबून असतो.

बाहेरील जगात .. डोकावून चांगल्या  वाईटाची व्याख्या ठरवण्यापेक्षा...अंतर्मनाचा वेध घ्या... आणि तेथे एकाग्र व्हा..त्यातुन तुम्हाला खरं आत्मिक समाधान मिळेल.
थोडक्यात.. कुठल्याही बाबतीत पूर्वग्रह नको..तरच तुम्ही सापेक्षपणे जीवनाकडे पाहू शकता.

      मग व्हा अंतर्मनाशी एकाग्र..आणि.. मिळवा..खरा आनंद जीवनाचा.

                      गोपालदास पाटील