Saturday, November 24, 2018

मला समजलेले मानसशास्त्र 15

 

        आजकाल सर्वच पालक मुलांवर त्यांची आवड शारीरिक, बौद्धिक क्षमता समजून न घेता आपले मत व इच्छा मुलांवर लादतात . त्यामुळे मुलांवर अनावश्यक दडपण येते हुषार असूनही योग्य क्षेत्र आवड लक्षात न घेता निवडल गेल्यास अपयश येवून मुलांच करीयर सुरू होण्याआधीच संपत. म्हणून आपल्या मुलांच्या आवडी निवडी वेळीच लक्षात घ्या.त्यांची बौद्धिक व शारिरीक क्षमता लक्षात घेऊनच करीअर क्षेत्राची निवड करा.

        याबाबत अविनाश धर्माधिकारी सरांनी एका उदाहरणासह खूप छान माहिती सांगितली.थोडक्यात कथानक याप्रमाणे आहे.तीन मित्र असतात.तिघही प्रायमरी पासून हायस्कुल पर्यंत शिक्षण एकत्रच असतात. तिन्ही भिन्न स्वभावाचे पण मैत्री मात्र अतुट असते.त्यापैकी अभ्यासात खूप हुषार,दुसरा त्यापेक्षा थोडा डावा,तर तिसरा अगदीच साधारन.पण जो साधारण असतो तो इतर बाबतीत म्हणजे संगठण कौशल्य,वेळ पडली तर कोणाशी दोन हात करायची तयारी ,असा असतो.वेळप्रसंगी आपल्या दोनमित्रांना कोणी त्रास दिल्यास त्यांच्या वाटेल ते करायची तयारी ,अशी ही मैत्री.दुसरा जो सर्वसाधारण असतो तो या दोघांकडे असलेल्या गुणवत्तेनुसार त्याची मदत घेणार व त्याच्या क्षमतेनुसार त्यांना मदत करणार.जो सर्वात हुषार असतो तो या दोघांना अभ्यासात मदत करतो.
        कालांतराने जो अगदी साधारण असतो तो 12नंतर शिक्षण सोडतो,जो हुषार असतो तो इंजीनियर होतो,तर सर्वसाधारण असतो बी.ए.नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करतो.
        काही अवधी लोटल्यानंतर हुषार इंजिनिअर होवून बांधकाम खात्यात नोकरीस लागतो.दुसरा स्पर्धा परीक्षा पास होवुन कलेक्टर हो तो व त्याच जिल्ह्यात बदली होऊन येतो जेथे त्याचा मित्र इंजिनिअर असतो.आणि तिसरा राजकारणत संघटन कौशल्याच्या जोरावर मंत्री होतो वत्याच जिल्याचा पालकमंत्री होतो.म्हणजे सर्वांत हुषार इंजिनिअर, सर्वसाधारण असतो तो कलेक्टर आणि अगदीच अभ्यासात साधारण तो मंत्री.म्हणून फक्त पुस्तकी गुणवत्ताच महत्वाची नसते तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळाले तर त्या त्या क्षेत्रात ते सर्वोच्च शिखर गाठू शकतात म्हणूनच मुलांच्या आवडीनूसार व क्षमतेनुसार त्यांचे क्षेत्र निवडू द्या,बघा यश त्यांच्या पायाशी असेल..
गोपालदा पाटील

Friday, November 23, 2018

मला समजलेले मानसशास्त्र 14

  


जर

असं असेल. असं नसेल.  
१. प्रेम. ‌ व्देष.  
२. समर्पन. अहंकार.  
३. निरपेक्ष. अपेक्षा.
४. विश्वास. अविश्वास.  
५. आस्था. अनास्था.  
६. प्रशंशा. टिका.  
७. शांती. अशांती.  
८. सकारात्मकता. नकारात्मकता.  
९. निस्वार्थ स्वार्थ.
मला वाटतं मानवी स्वभावाचे विविध रुपांचे असेल आणि नसेल अश्या योग्य पद्धतीने विभाजन करून विचार केला तर बर्याचश्या मानसशास्त्रीय समस्यांचे उत्तर ज्याचे त्यालाच मिळेल.

गोपालदास पाटील

Thursday, November 22, 2018

मला समजलेले मानसशास्त्र भाग 13

 



दुष्काळग्रस्थ शेतकरी 
आभाळाकडे डोळे करी 

शेत सर्व झाल भकास 
निरभ्र आहे सर्व आकाश 

डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा 
नेते फक्त घेतात सभा 

जनावरांना चारा नाही 
कुठेच आम्हाला थारा नाही 

सरकारी मदत होत नाही 
आमच्या पर्यंत ती येत नाही 

जगण्याची इच्छा खूप आहे 
परिस्थिती आत्महत्येकडे नेत 

लवकर याच्यावर करा उपाय 
अन्यथा आमच्याकडे नसेल पर्याय

गोपालदास पाटील


Tuesday, November 20, 2018

मला समजलेले मानसशास्त्र भाग 12

 

                        ‌.     ....... नात्यांच वास्तव.....

  वेगवेगळ्या नात्यांच निरीक्षण केले असता, बर्याच गोष्टीं
लक्षात येतात.खर तर प्रत्त्येक नात्यांबाबत सुरवातीलाच
काही पूर्वग्रह तयार झालेले दिसून येतात.

आई..खूप प्रेमकरणारी,
बाप..कठोर पण सर्वं कुटुंबाचा आधार,
भाऊ..पाठीराखा.
,बहिण..प्रेमळ..
..,मुलगा..आज्ञाधारक.
,मुलगी..प्रेमळ .
....हा झाला नात्यांचा एक संच.

     आता पहा दुसरा नात्यांचा संच व त्याबाबत समाजात तयार झालेले पूर्वमत. 
सासू....दुष्ट भांडखोर.
सासरा....सासूच्या मताने चालणार ..कठोर व्यक्तीमत्व.
सून....भांडखोर,मुलांचे कान भरणारी..
दीर....अतिशहाणा स्वार्थी..
नणंद...द्वेष करणार पात्र,..
जावाई...आईच्या ताटाखालच मांजर.

कशी गंमत आहे नाही ... पूर्वग्रहावरुन एकाच
व्यक्तीचे ..दोन वेगवेगळ्या नात्यांमध्ये ..दोन वेगवेगळे स्वभाव दाखविले जातात....खरच एकच नात ...प्रेमळ आणि दुष्ट ..कस असू शकते.जर त्यामागे काही पूर्वग्रह असतील.. तर दूर व्हायला पाहिजेत व त्यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे.

कारण वृद्ध सासू सासरे किंवा आईवडीलांच्या भूमिकेत असतील, मुलगी..सून नणंद बहिण,किंवा नातीच्या भूमिकेत असेल, मुलगा
.,जावाई,भाऊ,नातूच्या भूमिकेत असेल.जरी भूमिका वेगळ्या असल्या तरी मूळ स्वभाव जो असेल .. त्यात बदल होण्याच कारण नाही...बदल असतों आपल्या पूर्वग्रही दृष्टीकोनात.

गोपालदास पाटील

Sunday, November 18, 2018

मला समजलेले मानसशास्त्र 11

 


 

खरं पाहिल तर प्रत्येक घटनेनुसार आणि कारणा प्रमाणे पहाण्याची व वागण्याची मानसिकता बदलत जाते हेच खरे.फार पूर्वी शिवखेरांच एकापुस्तकात जे वाचले त्यातून ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. एका प्रसन्न सकाळी ट्रेनमधील प्रवासी आपल्या सीटवर निवांत बसून कोणी पेपर वाचत,कोणी गाणी ऐकत,तर कोणी निवांत डोळे मिटून विश्रांती घेत होते.गाडी एका स्टेशनवर थांबली, एका नवीन प्रवाश्याचे त्याच्या तीन लहान मुलांसह डब्यात आगमन झाले.तो प्रवाशी एका जागी डोळे मिटूनशांत बसला .पण इतका वेळ शांत असणारे वातावरण मुलांच्या दंगामस्तीने गजबजून गेले.पुढे हा गोंगाट इतका वाढला की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नापसंती दिसू लागली.तरी देखील त़ो इसम मात्र शांतपणे बसून होता.शेवटी न राहवून काही प्रवाशी त्या इसमाला म्हणाले, अहो , तुमच्या मुलांना आवरा, किती गोंधळ घालत आहेत.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नापसंती होती.त्या माणसाने डोळे उघडले.शांतपणे पण उदासीन चेहर्याने तो म्हणाला ,माफ करा माझ्या मुलांमुळे तुम्हांला त्रास झाला.पण मी यांना थांबवू शकत नाही.कारण आज सकाळीच यांच्या आईचं निधनझाले आणि ती बाॅडीताब्यात घेण्यासाठीच मी निघालो आहे.त्या निरागसमुलांना हे कटु सत्य माहित नव्हते. ते आपल्याच मस्तीत मशगुल होते.पुन्हा एकदा त्याने क्षमायाचना केली..इतर सह प्रवाश्यांच्या नजरा शरमेने खाली झुकल्या.नापसंतीची जागा करुना व पश्चातापाने घेतली.खरच कारण व परिस्थिती प्रमाणे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो हेच खरे.म्हणून संपूर्ण सत्य व वास्तव परिस्थिती माहित करुनघेतल्या शिवाय कोणाबद्दल मत बनवू नये.

गोपालदास पाटील

Saturday, November 17, 2018

मला समजलेल मानसशास्त्र 10


काळजी


हा क्षण माझा,पुढच्या क्षणाची शाश्वती नाही.
तरी देखील येणार्‍या भविष्याची चिंता खाई.

हजार वर्ष आयुष्य कोणाला मिळाल नाही.
तरी आम्हाला पाहिजे सात पिढ्यांची कमाई.

पक्षीही पिलाला उडायला शिकवून, सोडून देतात.
तुम्ही निष्कारण येणाऱ्या पिढ्यांची काळजी घेतात.

काळजी घेतल्याने पुढील पिढी निष्क्रिय होते.
उडण्यापुर्वीच पंखातील बळ निघून जाते.

ऐष आरामामुळे शरीर निष्क्रिय होते.
वेगवेगळ्या व्याधींनी ते पोखरले जाते.

म्हणून वर्तमानात निसर्गतः जगायला शिका.
भूत आणी भविष्यात जाऊ नका.

गोपालदास पाटील.


Friday, November 16, 2018

मला समजलेल मानसशास्त्र 9

  सकारात्मक



जीवनात सर्वच वाईट असतं असं काही नाही.
दुःखाच्या क्षणी चांगले क्षण आपण आठवत नाही.
चांगल्या क्षणांचा हा सुगंध असा उधळत जावा.
पाहुनी सुगंधी फुलांनाही वाटला पाहिजे हेवा.
रडगाने गाण्यासाठी मित्रांनो हे आयुष्य नसते.
शोधले तर सापडतात अनेक आनंददायी रस्ते.

गोपालदास पाटील

Thursday, November 15, 2018

मला समजलेल मानसशास्त्र 8

     कर्तव्य

  BSF जवान सुरेन्द्र सिंह चे इंडीयन आयडॉल मधील, मै वापस आऊंगा हे गाणं अणि त्याची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मी थोडा स्तब्द झालो. गाणं गावून झाल्यानंतर त्याने सांगितले की त्याला सुटी न मिळाल्याने तो बहिणीचे अंत्यदर्शनही घेवू शकला नाही. खरच कस असत सैनिकांच जीवन. कठीण परिस्थितीत , शत्रुंच्या जीवघेण्या हल्ल्यात जगण्याची व जगविण्याची उमेद कायम ठेवत , आनंद उत्साहात जगणं एव्हढ सोप नाहीं. त्यासाठी हवी उच्च दर्जाची मानसिकता आणि निडरपणा जो आमच्या सैनिकांनमधे ठासून भरला आहे. 

        कठोरपणे कर्तव्य पालन करत असताना, आप्तस्वकीयांच्या, अंत्यविधीलाही ते उपस्थित राहू शकत नाही. स्वताच्या जीवाची शास्वती नसताना, जेंव्हा ते गातात, मै वापस आऊंगा.... मैं वापस आऊंगा... हे ऐकून मन संमिश्र भावनांनी गदगदून येत. या अव्दितीय सकारात्मक मानसिकतेला, ह्रदयापासून सलाम. खरच कल्पणे पलीकडची आहे, यांची सकारात्मक मानसिकता.

गोपालदास पाटील

Tuesday, November 13, 2018

मला समजलेल मानसशास्त्र 7


मनोरंजन आणि वास्तव




        आजकाल नव्हे बर्‍याच वर्षांपासून, भारतीय गृहीणी टी.वी.सीरीयल मनोरंजन म्हणून न पहाता, त्यात स्वताचे पात्र शोधण्याचा प्रयत्न करतात.उदाहरणार्थ कजाग सून,कजाग सासू किंवा अशीच पात्र मनात रंगवितात.कुठेतरी अंतर्मनात ह्या भावना खोलवर रुजतात. त्याच दृष्टीकोनातून मग सुरु होत, एकदुसऱ्याचे मूल्यमापन. चांगल, दिसेनासं होत,फक्त उणिवा शोधून एकदुसऱ्याला दुषणे देण्याचा प्रयत्न केला जातो.मग मनोरंजन, मनोरंजन राहातं नाही. ती असते कुरुक्षेत्रावरील पहिली ठिणगी आणि मग सुरु होत महाभारत. 
        
        खरतर थोड्याफार फरकाने प्रत्त्येक कौटुंबिक, टी.वी.सिरीयल मधे हेच दाखविले जाते. भावनिक साद घालून, आपला सीरीजचा टीआरपी कसा वाढवता येईल, हा व्यवसायीक दृष्टीकोन, प्रत्त्येक निर्मात्याचा असतो. खर तर अश्या सीरीयल मनोरंजन म्हणूनच घेतल्या पाहिजेत. मानसिक दृष्ट्या, त्यात गुंतता कामा नये. अन्यथा हलक्या फुलक्या विनोदी सीरीयल पाहून, आपलं जीवन हसतखेळत व आनंदी ठेवा.

गोपालदास पाटील

Sunday, November 11, 2018

मला समजलेले मानसशास्त्र 6



स्वभाव भिन्नता


          मनुष्य स्वभावाचे अनेक पैलू.....ठरवा आपण कोणत्या प्रकारात मोडतात व आपणास कोणत्या प्रकारात मोडायला आवडेल, तसेच कोणता प्रकार आपणास अजिबात आवडणार नाही.

१.सर्वांच मन जपण्यात आनंद
२.मन दुखावण्याचा आनंद.
३. स्वताची इमेज तयार करण्यासाठी गोड बोलणं व‌ त्यासाठी समोरच्याचे अवगुण दुर्लक्षीत करणं.
४.सत्य भलेच कटु असेल पण परखडपणे बोलणे.
५.आत्मपरीक्षण करुन स्वताचे गुणदोषांना परिणामाची परवा न करता सामोरं जाणं.
६. फक्त चांगलं तेच पहाण व इतर बाबींकडे दुर्लक्ष करण.
७.आत्मस्तुतीत संतुष्ट राहणं.
८.इतरांवर सतत टीका करणं.
९.स्वताचा इगो जपणं.
१०. फक्त स्वताच्या स्वार्थाचा विचार करणं.
११. दुसऱ्याला तुच्छ लेखण.
१२. मीच शहाणा , इतरांच्या भावनांचा विचार न करता.
१३.सर्वाना सहकार्य करणं व नेहमीच इतरांचा विचार करणं.
 
         सांगा, कोणत्या प्रकारची मानसिकता असलेली तुम्हांला आवडेल.

 गोपालदास पाटील

Wednesday, November 7, 2018

मला समजलेले मानसशास्त्र 5

        

खरे जीवन




        काल दिपावली निमित्त गांवी आल्यानंतरची ही पहिलीच प्रसन्न सकाळ.पुणेआणि गावाकडील वातावरणात असलेला फरक लगेच जाणवला.
जाणीव झाली आपण काय मिळवलं. १०० टक्के ऑक्सिजन, श्वासातील जिवंतपणाची जाणीव करुन देत होता.

        मानसशास्राच्या दृष्टीने पाहिले तर येथे मिळते उर्जा ,हा खरा उर्जेचा स्त्रोत. वरील छायाचित्र त्याचे जिवंत उदाहरण. प्रत्त्येकाच्या चेहऱ्यावर खरे हास्य. येथील प्रत्येक गोष्टीत आपलेपणा ,आलोखी , खरेपणा आणि निरागसता पदोपदी जाणवते. 

       मानसशास्त्रीय दृष्टीनेकोणातून पाहिले तर, चांगले स्वास्थ व निरागस जीवन, यामुळे मनोविकाराला कोणतेही स्थान नाही. ज्यांना ह्या जीवनाचा आनंद घ्यायला मिळतो, ते खरे भाग्यवान. मग काढाल ना गावाकडे येण्यासाठी वेळ. हमी देतो गावाकडील एका ट्रीपमधे तुम्हाला वर्षाची उर्जा मिळेल.

गोपालदास पाटील

Monday, November 5, 2018

मला समजलेले मानसशास्त्र 4

     

समाधान


    मन चंगा तो कटोरीमें गंगा.खरच ही अगदी सार्थ म्हण आहे.मन समाधानी नसेल तर ऐश्र्वर्यही प्रभावहीन होते.म्हणून आपल्या आयुष्यात आनंद आणि समाधानाला प्रथम स्थान द्द्या.

    पण ते समाधान चांगल्या सवयी व कामातून मिळाले पाहिजे.चंचल मनाला योग्य दिशेला वळवून राग ,लोभ आणि अहंकार विरहीत व चार लोकांना , आपल्याला त्यातुन आनंद व समाधान मिळेल ,ते खरे समाधान .

    असे समाधान ज्याला मिळवता येत , तो खरा मनोशिल्पकार.कारण स्वताच्या व इतरांच्या भावनां जपणे ज्याला जमते,तो समाजात मनस्वास्थ निर्माण करण्याचं काम करतो.सुदृढ मानसिकतेचे धडे गिरवणारा देखील मानसशास्त्रातील एक स्तंभ म्हणायला हरकत नसावी.

गोपालदास पाटील

Saturday, November 3, 2018

मला समजलेले मानसशास्त्र 3

 संघर्ष

 
मला वाटतं दोन पिढ्या तील संघर्षाला सुरुवात होते ती अधिकारावरुन.जुनी पीढी सहजी आपले अधिकार सोडायला तयार नसते.कारण ती त्या पिढीतून आलेली असतें ज्यात ते अधिकार मिळवण्यापूर्वी वयाची 40शी ओलांडलेली असते.पण नवीन पिढीला मात्र ते लगेच हवे असतात.
 
        खरं तर पूर्वी एक कुटुंब प्रमुख 50 ते 100 लोकांचे कुटुंब हाताळायचा.संबधही आलोखी आणि जिव्हाळ्याचे असायचं. मग आता काय झालं. आता सर्व उच्चशिक्षित झाले पण. संस्कारांचाा अभाव म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांवर आलोखी, प्रेम , जिव्हाळ्याचे संस्कार घडायचे.वडीलधार्यांचा आदर केला जायचा.पण आज ती परिस्थीती बदलली.

       विभक्त कुटुंब पद्धती मुळे मुलांना फक्त आईवडीलांचे नाते माहित असते.इतर नात्यांच्या बाबतीत जिव्हाळा उत्पन्न होत नाही.एकटे राहण्याची सवय व स्वतापुरत पहाण्याची सवय लागते.त्यातूनच मानसिकताही बदलते.पुर्वी स्थळ पहाताना मुलीं साठी मोठं घर म्हणजे जास्त सदस्यअसलेल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं जायचं.पण आता मात्र मुलगा एकटाच आहे ना ?,त्यांच्यावर इतर जबाबदारी नाही ना? अश्या संकुचितमानसिकतेचे दर्शन घडते.

        पूर्वी घटस्फोटाचे प्रकार फार कमी होते पण आता त्यातही वाढ झालेली दिसून येते.हे सर्व दोष विभक्त कुटुंब पद्धतीचे आहेत.कारण संस्कार घडत नाही ,आलोखी निर्माण होत नाही.
 
        ठीक आहे , आजची जीवनशैली बदलली आहे.कामानिमित्त सर्वांना एकत्रित राहाने शक्य नाही.पण जिव्हाळा कायम राहाण्यासाठी आपण वर्षातून दोनदा मुलांना सुट्या असताना एकत्र येऊन आपल्या हरवलेल्या गोष्टी मिळवू शकता, त्या गोष्टी म्हणजे आपसातील प्रेम आणि जिव्हाळा.शेवटी एव्हढच म्हणेल.......
 
वाढवा प्रेम जिव्हाळा..
आपसातील संघर्ष टाळा

गोपालदास पाटील


Friday, November 2, 2018

मला समजलेले मानसशास्त्र २

दिल्ली मुंबई रेल्वे प्रवासातील ही घटना.


    वरवर पाहिलं तर रोजच्या प्रवासात अनेकजण भेटताता पण त्यातील काही ठराविक लक्षात राहतात. मधे एका स्टेशनवर गाडी थांबली असता एक साधु , पांढरी वस्त्रे परिधान केलेला व एक विदेशी महिला डब्यात प्रवेश करतात. तो साधु साधारण वय असेल 24,25 वर्षं.नंतर ती लेडी व त्याच्यात इंग्रजीत संभाषण सुरू झाल.अस्खलीत इंग्रजीत बोलत होता.जिज्ञाशेने मी विचारलं की साधु असूनही इतकं चांगलं इंग्रजी कसे बोलता. उत्तर होते मी 8 वर्ष U S ला होतो व ही एक संगीत टीचर आहे ही मला तेथेच भेटली. थोडयाच वेळात चेकर आला.दोघानी आपापले पासपोर्ट दाखविले.

 मग झाली संभाषणाला सुरवात. त्याने सांगितले तो नेपाळचा आहे . त्यांच्या गुरुने स्वताचा मार्ग स्वता शोधायला सांगितला.त्यासाठी तो हिमालय ,मथुरा नासिक परिसर अश्या अनेक ठिकाणी जाऊन आला.इतका शिकलेला व US सारख्या चांगल्या ठिकाणी चांगली नोकरी सोडून या तरुण वयात हा रानोमाळ का फिरत आहे हे एक कोडेच आहे.

मेडीटेशन ,अघोरी साधना, यावर तो बरेच काही समर्पक बोलला.त्याला मी एक प्रश्न असा केला की, गेले काही वर्षांत अस्या बर्याच घटना घडल्या ज्यात दर्शनासाठी गेलेली बरीच लोक मृत्युमुखी पडले, मग ती मागे छत्तीसगड केदारनाथ येथील प्रलय असो किंवा
भाविकांच्या गाड्यांना झालेले अपघात ,असं का होत ,खरं देवाने या त्यांच्या भाविकांना वाचवायला हवं होत.

यावर त्याने दिलेले उत्तर फार समुचित होत.तो म्हणाला संसारी व्यक्तीकी सोच अलग होती है.हम साधु इसे मुक्ती के नजरिये से देखते है. मुक्ती पाने के लिये सहस्त्र योनीयो हे गुजरना पडता है.मनुष्य योनी से वो समयसे पहले मुक्ती पा गये ,ये तो उनके लिये भगवानका वरदान है.मी निरुत्तर झालो.खरच पहाण्याच्या दृष्टीकोनातून मानसशास्त्र बदलते.

मी मृत्युला शोकांतिकेच्या दृष्टीने पाहुन प्रश्नचिन्ह उभे केले पण त्याने मात्र मृत्यूला मुक्ती संबोधून सकारात्मकतेचा परिचय दिला व सर्व गोष्टी निरपेक्षपणे कश्या पहाव्यात हे सांगितले.

.............. जी. एम्. पाटील...........