खरं पाहिल तर प्रत्येक घटनेनुसार आणि कारणा प्रमाणे पहाण्याची व वागण्याची मानसिकता बदलत जाते हेच खरे.फार पूर्वी शिवखेरांच एकापुस्तकात जे वाचले त्यातून ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. एका प्रसन्न सकाळी ट्रेनमधील प्रवासी आपल्या सीटवर निवांत बसून कोणी पेपर वाचत,कोणी गाणी ऐकत,तर कोणी निवांत डोळे मिटून विश्रांती घेत होते.गाडी एका स्टेशनवर थांबली, एका नवीन प्रवाश्याचे त्याच्या तीन लहान मुलांसह डब्यात आगमन झाले.तो प्रवाशी एका जागी डोळे मिटूनशांत बसला .पण इतका वेळ शांत असणारे वातावरण मुलांच्या दंगामस्तीने गजबजून गेले.पुढे हा गोंगाट इतका वाढला की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नापसंती दिसू लागली.तरी देखील त़ो इसम मात्र शांतपणे बसून होता.शेवटी न राहवून काही प्रवाशी त्या इसमाला म्हणाले, अहो , तुमच्या मुलांना आवरा, किती गोंधळ घालत आहेत.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नापसंती होती.त्या माणसाने डोळे उघडले.शांतपणे पण उदासीन चेहर्याने तो म्हणाला ,माफ करा माझ्या मुलांमुळे तुम्हांला त्रास झाला.पण मी यांना थांबवू शकत नाही.कारण आज सकाळीच यांच्या आईचं निधनझाले आणि ती बाॅडीताब्यात घेण्यासाठीच मी निघालो आहे.त्या निरागसमुलांना हे कटु सत्य माहित नव्हते. ते आपल्याच मस्तीत मशगुल होते.पुन्हा एकदा त्याने क्षमायाचना केली..इतर सह प्रवाश्यांच्या नजरा शरमेने खाली झुकल्या.नापसंतीची जागा करुना व पश्चातापाने घेतली.खरच कारण व परिस्थिती प्रमाणे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो हेच खरे.म्हणून संपूर्ण सत्य व वास्तव परिस्थिती माहित करुनघेतल्या शिवाय कोणाबद्दल मत बनवू नये.
गोपालदास पाटील
No comments:
Post a Comment