Tuesday, November 13, 2018

मला समजलेल मानसशास्त्र 7


मनोरंजन आणि वास्तव




        आजकाल नव्हे बर्‍याच वर्षांपासून, भारतीय गृहीणी टी.वी.सीरीयल मनोरंजन म्हणून न पहाता, त्यात स्वताचे पात्र शोधण्याचा प्रयत्न करतात.उदाहरणार्थ कजाग सून,कजाग सासू किंवा अशीच पात्र मनात रंगवितात.कुठेतरी अंतर्मनात ह्या भावना खोलवर रुजतात. त्याच दृष्टीकोनातून मग सुरु होत, एकदुसऱ्याचे मूल्यमापन. चांगल, दिसेनासं होत,फक्त उणिवा शोधून एकदुसऱ्याला दुषणे देण्याचा प्रयत्न केला जातो.मग मनोरंजन, मनोरंजन राहातं नाही. ती असते कुरुक्षेत्रावरील पहिली ठिणगी आणि मग सुरु होत महाभारत. 
        
        खरतर थोड्याफार फरकाने प्रत्त्येक कौटुंबिक, टी.वी.सिरीयल मधे हेच दाखविले जाते. भावनिक साद घालून, आपला सीरीजचा टीआरपी कसा वाढवता येईल, हा व्यवसायीक दृष्टीकोन, प्रत्त्येक निर्मात्याचा असतो. खर तर अश्या सीरीयल मनोरंजन म्हणूनच घेतल्या पाहिजेत. मानसिक दृष्ट्या, त्यात गुंतता कामा नये. अन्यथा हलक्या फुलक्या विनोदी सीरीयल पाहून, आपलं जीवन हसतखेळत व आनंदी ठेवा.

गोपालदास पाटील

No comments:

Post a Comment