व्देष.ईर्षा नष्ट करा.
उत्साहाचा वाहिल झरा.
चालवू नका क्रोधाचे अस्र
त्यासाठीच आपलं मानसशास्त्र.
..गोपालदास पाटील...
व्देष.ईर्षा नष्ट करा.
उत्साहाचा वाहिल झरा.
चालवू नका क्रोधाचे अस्र
त्यासाठीच आपलं मानसशास्त्र.
..गोपालदास पाटील...
एक धनगर असतो .भल्या सकाळी रानात मेंढ्या च्या कळपासह नेहमी प्रमाणे आल्यानंतर एका पडक्या विहीरीतून त्याला मांजर ओरडल्या सारखा आवाज येतो.तो डोकावून आत पहातो.आत एक वाघीन तिच्या पिलासह दिसून येते.क्षणभर निरखून पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येते ,वाघीन मरुन पडली आहे आणि ते पिलू आपल्या आईजवळ घोटाळत आहे.मेंढपाळाला दया येते तो त्या पिलाला सोबत नेतो.मेंंढ्या व मेंढपाळाची शिकारी कुत्रीं यांच्यासोबत त्या पिलाची दिनचर्या आणि जीवन प्रवाह सुरु होतो.
दिवशेंदिवस ते पिलु मोठ होत आणि एक दिवस एका पूर्ण वाघीनीच्या रुपात रुपांतरीत होत.मेंढ्याच. दुध पित ,शिकारी कुत्र्यांसोबत खेळत एक रुबाबदार वाघीन आपल्या कळपाच रक्षण करते हे पाहून मेंढपाळही निर्धास्त असतो.
फारच वेगळ असतं हे जग.अनुभव गाठीशी असतात.संपुर्ण आयुष्य संघर्षात घालविल्याने व जगाचा बरावाईट अनुभव आल्याने मूळ स्वभावात बराचसा बदल पहावयास मिळतो.जेष्ठांच्या या ग्रुपमधे बरीच मंडळीजशी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले असतात तसेच कनिष्ठ म्हणूनही निवृत्त झालेली असतात.कोणी सैन्य दलातील कोणी पोलीस दलातील कोणी बॅंकेतील,तर कोणी वैद्यकीय ,सरकारी, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी ,कर्मचारी कोणी व्यापारी तर कोणी शेतकरी अश्या सर्व व्यवसायाशी संबंधीत लोक असतात.सर्वांचे अनुभव आपल्या कार्यक्षेत्रा प्रमाणे वेगळे असतात पण जेष्ठ पातळीवर जी प्रगल्भता असते ती थोड्याफार फरकाने सारखीच असते.महत्वाच म्हणजे तारुण्यातील उतावीळपणा ,कठोरता ,बडबड संपलेली असते.पण काही प्रसंगात बालकांचा निरागस वा हट्ट देखील अनुभवायला मिळतो.वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एकत्र आल्याने विविध क्षेत्रातील माहिती होते.या वयात नातवंड हे प्रेमळ नातं जास्त प्रिय असते.सुना मुलांशी कोणाचं जमत कोणाचं जमत नाही, काही उघड बोलतात ,काही झाकली मूठ सव्वा लाखाची,तर काही भरभरुन कौतुक करतात, प्रत्यकाच्या स्वभावानुसार आवड ठरलेली असते.कोणाला धार्मिक तर,कला,संगीत ,गाण्यात रस असतो, तर कोणाला स्वास्थसाठी ,योग ,प्राणायाम ,व्यायाम यात रस असतो.शांत वातावरणात आनंद लहरी निर्माण करण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न असतात.पण मला वाटतं या वयात बालकातील निरागसता तारुण्याच्या जोश आणि म्हातारपणातील प्रगल्भता यांचा संगम घडवून आणला तर जीवन अधिक आनंददायी व सुखकारक होईल.
खूप विचित्र असतो भावनांचा गुंता.गेल्या आठवड्यात माझी गोड नात आजारी होती.दोनदा डॉक्टरांकडे नेलं ,औषध बदलून झाली, फरक पडत नव्हता. ब्लड,युरीन सर्व टेस्ट केलेल्या , सर्व नार्मल, पण ताप कमी होत नव्हता. 103 च्या वर ताप गेल्याने काळजी वाटत होती. हसती खेळती बाहुली मलूल झाली होती,हसणे,बोलने सर्व विसरली होती. गेल्या वर्षी नातेवाईकांपैकी एकाची अवस्था स्वताच्या डोळ्यांनी पाहिली होती. वायरल वायरल म्हणून शेवटी कॅन्सर डिटेक्ट झाला होता. मन, तीचे तसेच लक्षण पाहून त्याच विचारांनी गुरफटले होते. त्या संपूर्ण कालावधीत नकळत डोळ्यांच्या कडा पाणावत होत्या. डोक्यात विचारांचं आणि मनात भावनांच काहुर माजलं होत. अतिशय विमनस्क अवस्थेत तो कालावधी गेला. शेवटी एक्सरे नंतर समजलं तिचे टॉन्सील वाढल्याने तो प्रॉब्लेम झाला. पण खरं सांगतो नेहमी ऊत्साही राहणारा मी त्या एका आठवड्यात पांच वर्षांनी वयस्क दिसू लागलो. पण ती व्यवस्थित झाल्यानंतर तोच उत्साह पुन्हा एकदा परत मिळाला. त्यातुन एक मात्र शिकलो की तुमचे शारीरिक स्वास्थ हे मनस्वास्थ्यावर अवलंबून असते. जेथे भावनीक गुंतणूक जास्त त्या नात्यांचा सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही परिणाम तेव्हढ्याच तीव्रतेने अनुभवास मिळतो.. नातीची तब्येत बिघडली आणिसुधारली ,ह्या दोन्ही घटनांमधे मी निराशा आणि वेदना तसेच उत्साह आणि आनंद तेव्हढ्याच तीव्रतेने अनुभवले. थोडक्यात मन स्वास्थ्य सर्वश्रेष्ठ आहे.
पैसे घेवून उपचार करणारे डॉक्टर अनेक आहेत . पण समाजाचं आपण काही देणे लागतो असा विचार करणारे विरळच.असच एक व्यक्तीमत्व आहे डॉक्टर मा. जगन्नाथ दिक्षीत.जर व्यवसायच करायचा असता तर करोडोने कमावले असते. पण मेडीकल कॉलेजमध्ये प्राध्यापक. डीन अशी पद भूषवत सरांनी रिसर्च साठी स्वताला वाहून घेतले.यादरम्यान अपार कष्ट करुन , अनेक प्रयोग करुन इन्शुलीनच्या अतिरिक्त प्रमाणामुळे वजन वाढते हे शोधून काढले . तसेच हे प्रमाण वाढण्यास कारणीभूत इन्शुलीनची किती मात्रा बाहेर पडते व किती वेळ त्याचा प्रभाव राहतो हेही शोधले.त्यावर अनुसरून आहारविहारची एक पध्दत मांडली.ज्यामुळे कित्येक लोक आज अनेक व्याधितून मुक्त झाली तेही विनामूल्य.कारण सर शिबिरात व्याख्यानातच सविस्तर मार्गदर्शन YouTube वरही सरांची अनेक व्याख्याने आहेत.सरांच्या म्हणण्याप्रमाने तुम्ही काहीही खायला किंवा प्यायला घेतल्यानंतर इन्शुलीनचे जे माप शरीरातून येते त्याचा प्रभाव 55मिनीटे असतो म्हणून ते पूर्ण युटीलाइज होण्यासाठी त्या पंचावन्न मिनिटांतच एक वेळचा आहार आटोपला पाहिजे.दिवसातील अश्या दोन वेळा निवडून 55 मिनिटांचे वेळापत्रक पाळल्यास 100 टक्के कफ पित्त वात व त्यामुळे वाढलेले वजन यातून पूर्ण मुक्तता मिळते.आरोग्य संजीवनी खरं तर हीच.शारीरीक आरोग्य चांगले तर मानसिक आरोग्य चांगले.मग कधी करता सुरवात.पण सुरवातीला आणि शेवट करतांनामा. दिक्षीत सरांचे आभार मानायला विसरु नका ज्यांनी ही जीवन संजीवनी आपणास विनामूल्य उपलब्ध करुन दिली.55 मिनीटाच वेळापत्रक पाळा . दोन जेवणातील मधल्या कालावधीत शक्यतो पाण्याव्यतिरिक्त काहीही घेवू नका. 45मिनीट चाला. मी ही जीवनशैली 3 महिने फॉलो केली 4 किलो वजन कमी झाल.माझ्यासारखे अनेक आहेत ज्यांना फायदा झाला. सरांनी संशोधनाच भांडवल न करता समाजाला ते विनामूल्य बहाल केल. म्हणून त्यांच्या कार्याने प्रभावित होवून स्वअनुभवातून अनेक जन स्वंयस्पूर्तीने समाजात सरांच्या कार्याचा सर्वांना आरोग्य लाभ मिळावा म्हणून प्रयत्नशील आहेत.सरांचे शतशा आभार.