मानसशास्त्र फक्त मानवा पुरतच मर्यादित असतं का? तर नाही हे फक्त मानवापुरतच मर्यादीत नाही.भलेच त्याला आपण पशुपक्षी शास्त्र म्हणू शकतो. मानवी स्वभावातील प्रेम किँवा क्रोध यावर जशी मानवी मानसिकता अवलंबून असते, तसेच प्रेम किंवा जिव्हाळा प्राणी किंवा पक्षांकडूनही मानवाच्या बाबतीत पहावयास मिळतो. दोनतीन वर्षांपूर्वी एक पोपट रोज सकाळी न चुकता बाल्कणीत येवून रोज आपल्या मधूर आवाजात सकाळी उठवायचा.त्याला माझी लहानगी नात पेरुची फोड, हिरवी मिरची किंवा इतर काही खाद्य पदार्थ द्यायची.रोज सकाळी पोपट येणार.दिवसभर थांबणार सर्वाच्या खांद्यावर ,डोक्यावर किंवा शेजारी न घाबरता बसणार ,संध्याकाळी मात्र उडून जाणार.काही वेळा आश्चर्य वाटायचं ,२५० फ्लॅटच्या सोसायटीत सर्वं फ्लॅट सारखे असताना १२व्या मजल्यावरील नेमका फ्लॅट हा कसा ओळखतो. पण नंतर जाणवलं प्रेमाचे ऋणानुबंध जेथे निर्माण होतात तेथे काहीच अशक्य नसत.रोज अगदी नियमित तो येणार हक्काने घरात फिरणार, घरातील एक सदस्यच वाटू लागला होता.पण सायंकाळी मात्र पुन्हा माघारी निघून जाणार . सतत दोन वर्षे हा कार्यक्रम चालू होता. पण अचानक एक दिवस तो गेला आणि परतलाच नाही , घरातील सदस्य रोज चातकासारखी बाल्कणीत जावून वाट पहायची पण परत आलाच नाही.नक्की काय झालं माहित नाही, कदाचित त्याच्याशी असलेले ऋणानुबंध तेव्हढ्यच कालावधीसाठी असतील.एक मात्र खरे अजूनही वाटत तो परत येवून खांद्यावर बसून चोचीने कान ओढेल.खरच भावनेचा ओलावा निर्माण होण्यासाठी फक्त प्रेम पाहिजे मग तो मानव ,प्राणी, पक्षी काहीही असो .त्याची ओळख पशुपक्ष्यांनाही तेव्हढीच कळत असते जितकी मानवाला.
गोपालदास पाटील
No comments:
Post a Comment