फारच वेगळ असतं हे जग.अनुभव गाठीशी असतात.संपुर्ण आयुष्य संघर्षात घालविल्याने व जगाचा बरावाईट अनुभव आल्याने मूळ स्वभावात बराचसा बदल पहावयास मिळतो.जेष्ठांच्या या ग्रुपमधे बरीच मंडळीजशी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले असतात तसेच कनिष्ठ म्हणूनही निवृत्त झालेली असतात.कोणी सैन्य दलातील कोणी पोलीस दलातील कोणी बॅंकेतील,तर कोणी वैद्यकीय ,सरकारी, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी ,कर्मचारी कोणी व्यापारी तर कोणी शेतकरी अश्या सर्व व्यवसायाशी संबंधीत लोक असतात.सर्वांचे अनुभव आपल्या कार्यक्षेत्रा प्रमाणे वेगळे असतात पण जेष्ठ पातळीवर जी प्रगल्भता असते ती थोड्याफार फरकाने सारखीच असते.महत्वाच म्हणजे तारुण्यातील उतावीळपणा ,कठोरता ,बडबड संपलेली असते.पण काही प्रसंगात बालकांचा निरागस वा हट्ट देखील अनुभवायला मिळतो.वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एकत्र आल्याने विविध क्षेत्रातील माहिती होते.या वयात नातवंड हे प्रेमळ नातं जास्त प्रिय असते.सुना मुलांशी कोणाचं जमत कोणाचं जमत नाही, काही उघड बोलतात ,काही झाकली मूठ सव्वा लाखाची,तर काही भरभरुन कौतुक करतात, प्रत्यकाच्या स्वभावानुसार आवड ठरलेली असते.कोणाला धार्मिक तर,कला,संगीत ,गाण्यात रस असतो, तर कोणाला स्वास्थसाठी ,योग ,प्राणायाम ,व्यायाम यात रस असतो.शांत वातावरणात आनंद लहरी निर्माण करण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न असतात.पण मला वाटतं या वयात बालकातील निरागसता तारुण्याच्या जोश आणि म्हातारपणातील प्रगल्भता यांचा संगम घडवून आणला तर जीवन अधिक आनंददायी व सुखकारक होईल.
No comments:
Post a Comment