Monday, December 24, 2018

मला समजलेले मानसशास्त्र 22

       

         एक धनगर असतो .भल्या सकाळी रानात मेंढ्या च्या कळपासह नेहमी प्रमाणे आल्यानंतर एका पडक्या विहीरीतून त्याला मांजर ओरडल्या सारखा आवाज येतो.तो डोकावून आत पहातो.आत एक वाघीन तिच्या पिलासह दिसून येते.क्षणभर निरखून पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येते ,वाघीन मरुन पडली आहे आणि ते पिलू आपल्या आईजवळ घोटाळत आहे.मेंढपाळाला दया येते तो त्या पिलाला सोबत नेतो.मेंंढ्या व मेंढपाळाची शिकारी कुत्रीं यांच्यासोबत त्या पिलाची दिनचर्या आणि जीवन प्रवाह सुरु होतो.

         दिवशेंदिवस ते पिलु मोठ होत आणि एक दिवस एका पूर्ण वाघीनीच्या रुपात रुपांतरीत होत.मेंढ्याच. दुध पित ,शिकारी कुत्र्यांसोबत खेळत एक रुबाबदार वाघीन आपल्या कळपाच रक्षण करते हे पाहून मेंढपाळही निर्धास्त असतो.

        एका रात्री जंगलातील एक वाघ त्या कळपाकडे येतो ,पहातो एक वाघीनच त्या कळपाच रक्षन करते आहे.तो हळूहळू पुढे येतो, वाघीन अंदाज घेत मागे मागे जाते ,शेवटी विश्वास पटतो की काही अपाय होणार नाही.परस्पर आकर्षण निर्माण होवून ती त्या वाघाबरोबर जंगलात जाते.
        जंगलात गेल्यानंतर खर्या संघर्षाला सुरुवात होते.कळपात आयत दुध,अन्न,पाणी सर्व मिळत पण जंगलात दिवसभर वणवण भटकल्या नंतर सायंकाळी एक पाण्याच तळ समोर पाहून आनंदाने त्या वाघीनीच् याघशातून पहिली डरकाळी बाहेर येते आणि तीला जाणीव होते अरे आपण मेंढी किंवा कुत्रीं नसून वाघ आहोत कारण आजपर्यंत फक्त त्यांचेच आवाज ऐकले होते पण आज स्वत्वाची जाणीव झाली.स्वता शिकार करुन मिळवलेल्या अन्नाची चव किती वेगळी असते ते कळले.स्वताच खर विश्व कळल.आज खरच आपल स्वंतंत्र जीवन काय आहे याची जाणीव झाली आणि खर्या अर्थाने वाघीनीच सामर्थ्य,बेदकरारपणा अनुभवायस मिळाला .
म्हणून स्वत्वाची जाणिव होण महत्वाच .धर्म जात प्रांत देश हे विसरुन मानवाला आपण मानव म्हणून जन्माला आल्याची स्वत्वाची जाणीव जेव्हां होईल तेव्हां पृथ्वीवरतलावरील सर्वं कलह, विध्वंश अणि युद्ध थांबलेली असतील आणि खरी शांतता नांदेल.मग बघा होतें का अस्तीत्वाची जाणिव.

गोपालदास पाटील

No comments:

Post a Comment