खरच आम्ही प्रगती केली का?
मोठमोठया आलीशान हौसींग सोसायट्या निर्माण झाल्या.हम दो हमारे दो अश्या चौकोनी कुटुंब संस्कृती अस्तीत्वात आली. घरात आल, दार बंद.
समोरासमोर फ्लॅट असूनही दोनदोन महिने संभाषण नसत. चुकुन समोर आल तरी एक स्माईल, संपल, परत पुढच स्माईल चुकुन समोर येतील तेव्हांच. खरच हा मानवी स्वभाव आहे? एक दुसर्याशी काही घेण नाही.
मी माझ्या सेवाकालात अश्या बर्याच घटना पाहिल्या, बाजूच्या फ्लॅटमधे चोरी होते आणि शेजारी आवाजाही येत नाही. एव्हढच नाही शेजारची व्यक्ती किती दिवस घरी आली नाही, हेही माहीत नसते. काही ठिकाणी तर प्रेत सडल्या नंतर कळते की तेथे काही झाले आहे.
आता एव्हढी उदासीनता जर असेल तर त्यांचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्ती घेणारच. मी सेवेत असताना एक घटना ज्यात एकाचा मनीलेंडीगचा व्यवसाय होता. खालच्या फ्लोरवर व वरच्या फ्लोरवर असे त्याचे दोन फ्लॅट होते. सर्व कुटुंब बाहेरगावी गेले.घरी वयोवृद्ध वडील एकटेच, स्पष्ट दिसत नसल्याने एकटेच घरी थांबले, घरात स्वयंपाक व घरकामाला बाई.
पण आपण गेल्यानंतर सुरक्षीतते च्या दृष्टीने घरातील परदेशी व देशी चलन असलेला बॉक्स खालच्या फ्लॅटमधे नेवून ठेवला. कारण वडील एकटे, दिसत नाही, कोणीतरी पैसे काढून नेईल ,म्हणून बॉक्स खालच्या फ्लॅटमधे., पण शेवटी चोरी झालीच.
दुपारी एक अनोळखी इसम आला आणि वजन जास्त म्हणून ,खालील सेक्युरीटी गार्डची मदत घेवून बॉक्स रीक्षात टाकला आणि निघून गेला. नंतर तो पकडला गेला हा भाग वेगळा.
काय दर्शवते ही लाईफ स्टाईल. वृदध व्यक्ती, नोकरांच्य भरवश्यावर, मालमत्ता रामभरोसे आणि जीवनही रामभरोसे.. मग त्या मानाने चाळी बर्या होत्या. जेथे एकदुसर्याशी, जिव्हाळ्याचे संबध असायचे, एकदुसर्याच्या,सुखदुःखात सहभागी असायचे.. एव्हढ्या इतर सुखसोयी नसतील, पण एक आपुलकीची भावना असायची.
अर्थात संपूर्ण दोष सोसायटी म्हणून म्हणत नाही, कारण जागेअभावी, बिल्डींग आणि फ्लॅट संस्कृतीने जन्म घेतला. पण तेथे कस राहव हे ठरवणारे तुम्हीआम्हीच आहोत..
काय हरकत आहे चाळीतील काही चांगल्या व आपुलकी निर्माण करणार्या गोष्टी सोसायटीतही जपायला., त्यातुन नुकसान काही नाही, झाला तर फायदाच आहे. कारण त्यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे माणसातील माणुसकी जिवंत राहील.
गोपालदास पाटील
No comments:
Post a Comment