Sunday, December 23, 2018

मला समजलेल मानसशास्त्र 21

 

        आज सकाळी सकाळीच टी.वी. वर एक दुखद आणि विचार करायला भाग पाडणारी बातमी पाहिली आणि विचार चक्र सुरू झालं.खरच का घडत हे , एक आई आपल्या तान्हुल्याची हत्या करुन स्वता आत्महत्या करते.काय होत असेल या क्षणी की आपल्या पोटच्या गोळ्याची माया देखील अश्या घटनां थांबवू शकत नाही.कुठुन येत असेल एव्हढीच कठोरता.स्वताला संपवून काय साधलं.त्या लहानग्याचा काय गुन्हा होता.असेल व्यथा,असेल त्रास म्हणून काय इतकं टोकाच पाऊल.
        खरच काय म्हणावं या मानसिकतेला.म्हणतात पुरुष कठोर असतात पण येथे एक स्त्री आणि माता हे दोन्ही शब्द संयम ,शांती आणि प्रेमासाठी ओळखले जातात.मग का घडावी अशी घटना? कदाचीत असतील काही कारण ज्यामुळे जगन असह्य झाले असेल.दुसरा मार्ग निघाला नसता का?
    एक मात्र खरं हल्ली संयम , आपसातील संवाद,थोड्या थोड्या गोष्टींवरुन टोकाचे मतभेद, फक्त नवरा बायको व मुलं इतका सिमित परिवार असतांना अश्या घटना घडण्याचे कारणच काय.
        संयमाचा अभाव,टोकाचा इगो, विभक्त कुटुंबात वडीलधाऱ्यांचा मार्गदर्शनाचा अभाव, धावपळीच्या जीवन,अस्थीर जीवनशैली, आपसातील हेवेदावे, संस्कारांचा अभाव,अतिशिक्षीत झाल्याने निर्माण झालेल्या अति महत्त्वाकांक्षा, शारीरिक दुर्बलता,सामंजस्याचा अभाव,अशी अनेक कारणे देता येतील.पण खरं कारण आहे संवादांचा अभावामुळे निर्माण झालेली मानसिक अशांतता.कुठेतरी हे थांबणं , गरजेचं आहे,नाहीतर ही भयावह परिस्थिती वाढतच जाईल.यासाठी प्रत्येकाने दिवसातून एक तास स्वताचे मानसिक व शारीरिक आरोग्यसाठी दिलाच पाहिजे.दिलखुलास बोलले पाहिजे, मनमुराद हसले पाहिजे, आनंद आणि उल्हास निर्माण करण्याची कला अवगत केली पाहिजे तरच यावर नियंत्रण मिळवता येईल.

गोपालदास पाटील

No comments:

Post a Comment