Wednesday, December 26, 2018

मला समजलेले मानसशास्त्र 23

 मानसिकता


        टीका कोणालाही आवडत नाही. सर्वांना हवी स्तुती. पण स्तुतीप्रीय माणूस टिकाकारां अभावी आपल सर्व बरोबर, या कल्पनेत रमेल हा सर्वात मोठा धोका. जर आपल्या आयुष्यात आपण काही चुकीचे करत असू , तर टीकेच्या माध्यमातून समजावल्यास त्यात गैर नाही. स्तुती करणार्यांना, चुकीचे असेल तर टीका करण्याचाही अधिकार आहे.

        टिकेला केवळ टीका म्हणून घेण्यापेक्षा, त्या टीकेचा सकारात्मक पद्धतीने घेतल्यास त्यातून खूप काहीमिळते. टीका जर वास्तव असेल तर त्यातून तुम्हाला समजते तुमची चूक, जी पुढे पुन्हा होणार नाही.

        टीका असते तुमच्या संयमाची परीक्षा, टीका शिकविते विपरीत परिस्थितीतील मानसिक संतुलन, त्या परिस्थितीतील तुमची निर्णय क्षमता. थोडक्यात टिकाकार तुम्हाला परिपूर्ण होण्यास मदत करतात. टीका करणही कठीण काम आहे,एव्हढ सोप नाहीं. म्हणून आपल्याला परिपूर्ण करायला हातभार लावनार्या या टिकात्मक मानसिकतेच खर तर स्वागतच करायला हवं.

गोपालदास पाटील

No comments:

Post a Comment