खूप विचित्र असतो भावनांचा गुंता.गेल्या आठवड्यात माझी गोड नात आजारी होती.दोनदा डॉक्टरांकडे नेलं ,औषध बदलून झाली, फरक पडत नव्हता. ब्लड,युरीन सर्व टेस्ट केलेल्या , सर्व नार्मल, पण ताप कमी होत नव्हता. 103 च्या वर ताप गेल्याने काळजी वाटत होती. हसती खेळती बाहुली मलूल झाली होती,हसणे,बोलने सर्व विसरली होती. गेल्या वर्षी नातेवाईकांपैकी एकाची अवस्था स्वताच्या डोळ्यांनी पाहिली होती. वायरल वायरल म्हणून शेवटी कॅन्सर डिटेक्ट झाला होता. मन, तीचे तसेच लक्षण पाहून त्याच विचारांनी गुरफटले होते. त्या संपूर्ण कालावधीत नकळत डोळ्यांच्या कडा पाणावत होत्या. डोक्यात विचारांचं आणि मनात भावनांच काहुर माजलं होत. अतिशय विमनस्क अवस्थेत तो कालावधी गेला. शेवटी एक्सरे नंतर समजलं तिचे टॉन्सील वाढल्याने तो प्रॉब्लेम झाला. पण खरं सांगतो नेहमी ऊत्साही राहणारा मी त्या एका आठवड्यात पांच वर्षांनी वयस्क दिसू लागलो. पण ती व्यवस्थित झाल्यानंतर तोच उत्साह पुन्हा एकदा परत मिळाला. त्यातुन एक मात्र शिकलो की तुमचे शारीरिक स्वास्थ हे मनस्वास्थ्यावर अवलंबून असते. जेथे भावनीक गुंतणूक जास्त त्या नात्यांचा सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही परिणाम तेव्हढ्याच तीव्रतेने अनुभवास मिळतो.. नातीची तब्येत बिघडली आणिसुधारली ,ह्या दोन्ही घटनांमधे मी निराशा आणि वेदना तसेच उत्साह आणि आनंद तेव्हढ्याच तीव्रतेने अनुभवले. थोडक्यात मन स्वास्थ्य सर्वश्रेष्ठ आहे.
No comments:
Post a Comment